अहमदनगर/प्रतिनिधी :- मे क्लासिक व्हील लि. आस्थापनेत बहुतांश कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद आहेत कोरोना १९ पादुर्भावमुळे गेल्या पाच महिन्यांपासून देशात लोक डाऊन सुरू आहे पण आता लॉकडाऊन मध्ये बऱ्याच प्रमाणात सूट मिळाली आहे यात विषय विषयांकित कंपनीने दैनंदिन काम सुरू केलेले आहे परंतु १० ते २० वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना डावलून नवीन कामगार कंत्राटदारा मार्फत भरती करून उत्पादन काढला जात आहे हे लोकांना लॉकडाउन काळातील पगारही दिलेला नाही त्याबाबत हि कामगारानी मागणी केलेली नाही तरीसुद्धा व्यवस्थापनाने जुन्या कामगारांना कामावर न घेतल्याने उपासमारीची वेळ आल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे म्हणून शासनाने लक्ष वेधण्यासाठी लॉकडाऊन चे सर्व नियम पाळात दररोज सकाळी ८ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत फक्त अन्याय झालेले दोन दोन कामगार उपोषणात सहभागी होतील शासनाच्या व्यवस्थापनाला त्वरित योग्य निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी कारवाई करावी अन्यथा मनकासे संघटनेकडून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी या आंदोलनाची सर्वस्वी जवाबदारी ही मे क्लासिक व्हील लि. व मा. सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्या वर राहील याची आपण नोंद घ्यावी असे पत्रक अहमदनगर मनकासे चे उपचिटणीस नंदू गंगावणे यांनी काढले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here