श्रीरामपुर/प्रतिनिधी :- टिळकनगर कामगार पतसंस्थेचे पदसिद्ध अधिकारी व कर्मचारी यांनी लाखो रुपये उचलले असल्याने मी संस्थेचा पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिलेला आहे व तो मंजूर देखील झालेला आहे सदर संस्थेमध्ये मी राजीनामा देण्यापूर्वी पूर्णपणे सक्रिय होतो म्हणून मला संस्थेच्या बारीक-सारीक अंतर्गत बाबी माहिती आहे त्या अनुषंगाने मी विश्वास पूर्वक सांगतो की संस्थेचे पदसिद्ध अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची मागील असलेला ॲडव्हान्स कुठल्याही प्रकारचा भरलेला नसताना आज रोजी संस्थेची इतर ॲडव्हान्स भरल्याचा सांगत आहे किंवा आपणास त्याच्या पावत्या देत आहे परंतु बँकेचे चालन क्रमवारीत जुळत नसून हा गैरव्यवहार आपल्या लक्षात आलेला आहे तरी मी आपणास विनंती करतो की सदर प्रकार हा फसवणुकीच्या सदरातील आहे तरी आपण सन २०१५ व सन २०२० या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्याकडे असलेल्या लाखो रुपये वसूल करावे अन्यथा मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे पत्रक मा. संचालक शांतवन सोनवणे यांनी काढले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here