श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती सदस्य डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या टाकळीभान गणातील लाभार्थी शेतकऱ्यांना सौर वीज पंप, विहीर दुरुस्ती साठी अर्थसहाय्य, इलेक्ट्रिक मोटर साहित्याचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आल
टाकळीभान श्रीरामपूर पंचायत समिती च्या वतीने टाकळीभान गणातील कर्तव्यदक्ष पंचायत समितीच्या सदस्य डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या अधिपत्याखाली पंचायत समिती कृषी योजना मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना सौर वीज पंप ,विहीर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, इलेक्ट्रिक मोटार साहित्य यांचे लाभ देण्यात आले यावेळी त्याची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी नारायण सोना रणनवरे, मोहन सोना रणनवरे शहाजी यशवंत कांबळे ,अशोक दौलत रणनवरे ,अशोक भास्कर रणनवरे ,पावलस पेत्रस रणनवरे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला, त्यांनी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचे आभार मानून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत शेतात जाऊन योजनेची व कामाची माहिती घेतली. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री रामराव कडलक साहेब, कृषी विस्तार अधिकारी अजिता नंद पावसे कृषी विस्तार अधिकारी दीपक मेहेर अर्जुन राऊत अनिल कांबळे मोहन रणनवरे व आबा रणनवरे व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
Home श्रीरामपूर टाकळीभान गणातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या साहित्याची पंचायत समिती सदस्य डॉ वंदनाताई मुरकुटे...