पैठण : आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप युवा मोर्चाचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांची निवड केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे युवा शक्ती ची ताकद उभी करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांची निवड केली आहे. आपण तळागाळातील मतदारांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचून पक्ष वाढीवर भर देणार असल्याचे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी निवडीनंतर सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here