श्रीरामपुर :- श्रीरामपुर शहरातील मानाचं गणपती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्री ची आरती आज पत्रकारांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी मनोजकुमार आगे,विष्णु वाघ, करण नवले, शिवाजी पवार, जयेश सावंत, असलम बिनसाद, स्वप्नील सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मंडळाचे कार्याध्यक्ष मनोजकुमार नवले यांनी पत्रकार हे सर्व प्रकारचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोचविण्यात महत्वाची भूमिका बजावतात कोरोनासारख्या महामारी रोगाबद्दल जी लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती ती काढण्याचे काम श्रीरामपुरातील पत्रकार यांनी केले आहे म्हणून त्याचा सन्मान म्हणून सर्व पत्रकाराना कॉविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले पुढे बोलताना ते म्हणाले पत्रकार व्यस्त दिनक्रमामुळे त्यांना स्वतःला कार्यक्रमात भाग घेता येत नाही.यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या हस्ते श्री च्या आरतीचा कार्यक्रम केल्याचे सांगितले. त्यानंतर मंडळाचे सेक्रेटरी कुणाल करंडे यांनी पत्रकार विषयी बोलताना सांगितले की परशुरामांच्या परशुने श्रीगणेशाचा अर्धा दात तुटला आणि त्याच तुटलेल्या दाताने श्रीगणेशाने महाभारत लिहिले. त्याच दाताची शक्ति सर्व पत्रकारांच्या लेखनित होती व आहे व राहील. समाजात कोरोना मुळे जी भीती निर्माण झाली आहे. ही भीती बाहेर काढण्याचं काम पत्रकार बांधवांनी केले आहे आभार प्रसंगी जय बाबा चे संपादक मनोजकुमार आगे यांनी गणपती स्तोत्र गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ( माजी नगराध्यक्ष) अनिल कांबळे श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजीनियर्स असोशियन श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. के.के. आव्हाड मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था श्रीरामपूरचे अध्यक्ष श्री. अनिल साळवे ,कार्याध्यक्ष मनोज नवले, सेक्रेटरी-कुणाल करंडे, उपाध्यक्ष- सोमनाथ महाले, सूर्यकांत सगम दादासाहेब सुरडकर, अनिल छाबडा, वैभव सुरडकर, गुरु मनोज जोशी, किशोर फासगे, ओम दळवी,लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here