श्रीरामपूर: अवैधरित्या गांजा कब्जात बाळगणारा जेरबंद दिनांक ०१/०९/२०२० रोजी श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमोदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत संजयनगर वार्ड नं २ श्रीरामपुर परिसरात एक इसम गांजा घेऊन येणार आहे आशी माहिती मिळालेने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावुन आरोपी कमलेश उत्तम पवार व २३ वर्ष रा.अहिल्यानगर,वार्ड नं.२,श्रीरामपुर यास ताब्यात घेतले असुन त्याचेकडुन ६७,०००/- रुपये किमतीचा उग्र व दर्प वासाचा गुंगीकारक गांजा मिळाला असून त्याविरुद्धश्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६६४/२०२० एन.डी.पी.एस.अक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(२)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरचा गांजा कोठून आणला असुन तो कोणास विक्री करणार आहे याबाबत अधिक माहिती घेत असुन पुढील तपास करत आहे,


सदर कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ. दिपाली काळे.अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा.श्री.राहुल मदने, उपविभागीय पोलीसअधिकारी, श्रीरामपुर विभाग, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह सपोनि /समाधान पाटील, तपास पथकाचे पोसई /संतोष बहाकर, पोहेकॉ/जे.केलोंढे पोकॉ/सुनील दिघे,पोकॉ/गणेश गावडे,पोकॉ/ महेंद्र पवार, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ/ किशोर जाधव मपोकॉ/अर्चना बर्डे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here