शिर्डी – श्री साईबाबा संस्थान मधील कामगारांची पगारात कपात न करण्याबाबत व साईबाबा सूर्फेस लिस्ट हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन व एम आर आय मशिन बदलण्याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य कार्यकारी मुख्याधिकारी बगाटे साहेब यांना निवेदन देण्यात आले,
साईबाबा संस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कायम कामगारा सोबत ठेकेदारी पद्धतीने आपल्या विविध विभागात हंगामी कामगार कामास आहे कायम कामगारांसोबत हे कामगार संस्थांमध्ये चांगल्या प्रकारे सेवा पुरवीत आहे याची जाणीव व कल्पना असताना मात्र काही हेकेखोर अधिकाऱ्यांनी या कंत्राटी कामगारांच्या सेवा विचारात न घेता संस्थांना त्यांनी दिलेले योगदान नजरेआड करून लॉक डाऊन चे निमित्त पुढे करून 40% कामगार पगार कपात करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप तिलक डुंगरवाल यांनी केला, कंत्राटी कामगारांचे कधीही न भरून येणारे असे अपरिमित नुकसान होणार आहे कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षापासून सेवा देत आहे, यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय,शिक्षक, वाहनचालक, स्वच्छता कर्मचारी, इंजिनीयर, लिपिक अशा अनेक पदावर कंत्राटी पद्धतीने संस्थेच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करत असतात, देशभरामध्ये कोरोनाचे मोठे संकट आले असता कामगार न घाबरता काम करत होते त्यापैकी अनेक जणांना कोरोना ची बाधा ही झाल्या व साई बाबा च्या आशीर्वादाने ते सुखरूप परतले
कामगारांवर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्य व त्यांच्या शैक्षणिक सामाजिक तसेच आर्थिक गरजा व मोठ्या विपरीत परिणाम होणार आहे या कपातीमुळे एखादा कर्मचारी त्यांची जीवनयात्रा संपवण्याचा धोका भावी काळात निर्माण होईल हे घडू नये म्हणून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी धोरण स्वीकारून ठेकेदाराने संस्थांमध्ये असलेल्या कामगारांची कोणत्याही प्रकारे पगार कपात करण्यात येऊ नये तसेच साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील निमित्त रोगावर उपचार करण्यासाठी अनेक रुग्ण येतात या हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीन व सिटीस्कॅन मशीन नेहमीच नादुरुस्त असते त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते व आर्थिक नुकसानही सोसावे लागते संपूर्ण देशामध्ये विशेषता महाराष्ट्रामध्ये साईबाबा देवस्थान ची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे हॉस्पिटल मधील दोन्ही मशीन त्वरित काढून त्याजागी नवीन मशीन बसवावी व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल जितेश लोकचंदाणी, अशोक बोबडे , आपचे जिल्हा सचिव राहुल रणपिसे, जिल्हा समिती सदस्य प्रकाश पवार, आदींनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here