श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील ७३६५ एकर आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांची बाजू मांडताना आकारी पडीत शेतकऱ्यांची जमीन इंग्रज सरकारने साखर कारखाना काढण्यासाठी घेतली असून ही जमीन पडीत नव्हती ना तिचा आकार थकलेला होता ही जमीन जबरदस्तीने विनामोबदला बळकवलेली आहे आज सदर जमीन शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात २००५ मध्ये शासनाने शपथपत्र देऊनही अद्याप जमीन शेतकरयांना मिळालेली नाही आपण परत महसूल मंत्री झाल्यामुळे या अन्यायग्रस्त आकारी पडीत शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे हरेगाव मळ्यातील निविदा प्रक्रिया त्वरित थांबवा व शेतकऱ्यांना जमीन वाटप करा या बाबत २० ऑगस्ट रोजी तुम्हाला मेल केला होता आजही परत विनंती शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करत असल्याचे विनंती निवेदन देतो, अशी विनंती मागणी केली त्यावर महसूल मंत्री थोरात यांनी शासनाने खंडकरी व आकारी पडीत जमीन मुळ शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला असून खंडकरी जमीन वाटप प्रक्रिया चालू असून ५-१० % काम शिल्लक आहे. मागील ५ वर्षात या विषयात कुठलीच प्रगती झाली नसल्याचे सांगितले.
२० तारखेला तुमचा(आकारी पडीत शेतकऱ्यांचा) मेल आला आमदार कानडे तसेच करण ससाणे यांचा फोन आल्यानंतर मी हरेगाव फॉर्मची निविदा प्रक्रिया तातडीने थांबवली असल्याचे सांगितले फक्त इतर फार्मबरोबरची एकत्रित जाहिरात असल्यानं ती प्रसिद्ध झालेली आहे .
आमदार लहू कानडे यांनी महसूल मंत्री पद स्वीकारल्यावर लगेच थोरात साहेबांनी आकारी पडीत व खंडकरी प्रश्नाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला असून शासन सकारात्मक असताना जमीन वाटण्याचा निर्णय झालेला असताना परत परत याचिका कशासाठी? विषय न्यायप्रविष्ट असल्याने निर्णय प्रक्रिया थांबते मा. न्यायालयाने एकदा आदेश केलेला असताना परत परत याचिका केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
या चर्चेत आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, इंद्रनाथ थोरात , ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर , अरुण पाटील, सुधीर नवले यांचे सह आकारी पडीत शेतकरी दिलीप गलांडे,सुरेश ताके,भरत आसने,शेखर आसने,विठ्ठल आसने,योगेश आसने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here