श्रीरामपुर(प्रतिनिधी):- बऱ्याच दिवसापासून गुन्हे करणारे सोनसाखळी गुन्हेगार याना पकडण्यास श्रीरामपुर पोलीसांना यश मिळाले आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणारे दोघेजण सचिन लक्ष्मण ताके व बबन चंद्रभान राशीनकर असे या दोन जणांना अटक करण्यास श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे.या दोन्ही गुन्हेगारांनी श्रीरामपुर,शिर्डी, राहता, कोपरगाव, राहुरी,लोणी,संगमनेर राहुरी या भागात त्यांनी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे पोलिस चौकशी मध्ये निष्पन्न झाल्याचे आढळून आले असून बाकीच्या ही अनेक गुन्ह्यामध्ये हे सामील होते त्यांच्या वर वरील पोलीस शाखेत त्यांच्यावर गुन्हे ही नोंद झालेले आहे.त्यांतील बबन चंद्रभान राशीनकर याने या पूर्वी राहता पोलिसांवर गोळीबार सुद्धा केलेला होता.आशा या सरायत गुन्हेगार याना शेवटी पकडण्यास श्रीरामपुर पोलिसांना यश आले आहे.त्यांच्या वर गु. र.नं १५४५/२०२० भादविक ३९२,३४ तसेच गु. र.नं १५४६/२०२० भादविक ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कडून ६ ग्राम सोने हस्तगत केले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
सदरची कारवाई अखिलेश कुमार सिंह,पोलीस अधिक्षक ,अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलिस अधिक्षक,श्रीरामपुर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सह पोसई/अतुल बोरसे,तपास पथकाचे पोहेकॉ/जे. के.लोंढे,अर्जुन पोकळे,सुनील दिघे,पंकज गोसावी,महेंद्र पवार,गणेश गावडे,अर्चना बर्डे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here