रांजणखोल(वार्ताहर)भाऊसाहेब जाधव :- श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भुषण सचिन गुलदगङ यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया खंडातील बुधवार पेठेतील भिङेवाङा पुणे येथील फुले दांपत्यानी प्रथम सुरु केलेल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची  मागणी श्रीरामपुर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली  गेल्या अनेक दिवसांपासून फुले प्रेमींची मागणी आहे पुणे येथील “फुले दांपत्य” यानी १ जाने.१८४८ रोजी स्थापन केलेली बुधवार पेठेतील “भिडेवाडा” येथील मुलींची “पहिली शाळा” तीची सद्य स्थितील झालेली दयनीय दुरावस्था नाहीशी करुन, ती जागा शासनाने रितसर संपादीत करुन त्या जागेचा विकास करावा व त्यास “राष्ट्रीय स्मारक” म्हणून घोषीत करावे… वर्षा पासून  महाराष्ट्रतील  फुले  प्रेमींच्या वतीने  वरील मागणी साठी वेळोवेळी निवेदने शासनाला देण्यात आलीत. एवढेच  नव्हे तर, विविध मोर्चे, रॅली, आंदोलने  छेडण्यात आलीत.  तथापि, अद्यापि  शासना कडून अक्षम्य दिरंगाई होत आहे.  सदर मागणी पूर्ण न झाल्यास श्री संत सावता माळी युवक संघा  तर्फे आंदोलने करण्यात येतील असा इशारा  निवेदनात आहे  श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर तालुका अध्यक्ष  महेश दारूंटे,उपाध्यक्ष श्री सागर सोनवणे, संघटक संदिप विधाटे,  सहसंघटक बिपिन म्हसे, कार्याध्यक्ष अमोल पुजारी, शहर संपर्क प्रमुख महेश सोनवणे,प्रसिद्ध प्रमुख पत्रकार भाऊसाहेब जाधव,सोशल मीडिया प्रमुख अक्षय अभंग,आतंरराष्ट्रीय मानव अधिकार जिल्हाउपाध्यक्ष अमोल साबणे,खोकर अध्यक्ष योगेश सलालकर, मयूर शिदे, ज्ञानेश्वर ताबे आदी फुले प्रेमी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here