कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- तालुक्यातील चांदेकसारे येथील मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्याश्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर शिवाजी होन यांची राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य चांदेकसारे गावच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र कोपरगाव तालुका अध्यक्ष किशोर महाराज गायकवाड व उपाध्यक्ष रंगनाथ महाराज विखे यांच्या हस्ते देण्यात आले.या परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्ती महाराज वक्ते असुन तर परिषदेचे मुख्य कार्यालय मुक्ताबाई मठ पंढरपूर येथे आहे. अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष विश्वनाथ महाराज विखे कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज लांडे यांनी ही निवड केली आहे.या परिषदेचे कामकाज राजकारण विहिरीत असुन भागवत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे आ आशुतोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण ,माजी सभापती अनुसयाताई होन,रोहिदास होन, माजी सरपंच केशवराव होन, शंकरराव चव्हाण, डॉ रोकडे, शांतीलाल होन, सुधाकर होन, विलास चव्हाण, सचिन होन, दादासाहेब होन, पंकज होन, प्रवीण होन,सतिष चव्हाण आदी सह श्रीराम पंचायतन आश्रम ट्रस्ट च्या सर्व सदस्य, ग्रामस्थ व भजनी मंडळाने अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here