कोपरगाव प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी व त्या सोडवण्या दृष्टिने विचार विनियम करण्यासाठी संगमनेर येथे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची बैठक माननिय ( ब्रिगेडीयर ) खा.सुधीर सावंत यांच्या समवेत संपन्न झाली या बैठकी उत्तर नगर जिल्हातील माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवा व कँटीन ची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व इतर अडीअडचणी सोडवण्या दृष्टीने शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला दोन वर्षापुर्वी माजी सैनिकांच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी सैनिक फेडरेशन संघटनेची स्थापना करण्यात आली. आजमितीला संघटनेमार्फत माजी सैनिकाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी पाठपुरावा करून मान्य करून घेतली.तसेच सरकारी नोकरीमधील माजी सैनिकांसाठी १५ % आरक्षित असलेल्या जागा काही नियम अटी शिथिल करून भराव्यात व सेवा निवृत्त सैनिकांना व्यवसायिक बनवण्यासाठी शासनाने काही उपक्रम राबवावे यासाठी वेळोवेळी बैठकी घेऊन पाठपुरावा केला जातो.

या बैठकीत सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष खा.सुधीर सावंत,उपाध्यक्ष नारायण अंकुशे, सचिव महाराष्ट्र राज्य संघटना व कोपरगाव माजी सैनिक असोशिएशनचे अध्यक्ष (सुभेदार )शांतीलाल होन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here