श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार लहू कानडे यांच्या हस्ते कोव्हीड सेंटरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांच्या टपऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींच्या समवेत त्यांचे सहकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, यांच्यासह ५३ लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोव्हीड १९ च्या काळात राज्यात कलम १४४ लागु असताना कायद्याचें उल्लंघन करून बेजबाबदारपणे गर्दी करणाऱ्या बेजबाबदार व निष्क्रिय आमदारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी श्रीरामपूरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


                  दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला दरवाढ मिळावी म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपा पदाधिकार्‍यांवर व दूध उत्पादक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणाऱ्या आमदारांनीच कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला. गावांमध्ये विना मास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचें पालन न करणाऱ्या नागरिकांवर अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र,  लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे कोणत्याही प्रकारचे नियम न पाळले नाही. कोव्हीड सेंटर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या असताना देखील सेंटरच्या लगत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातुन 53 लाभार्थीं आपल्या वाहनांसह उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येण्याऱ्या टपऱ्यांचे सुट्टे भाग हे कोव्हीड सेंटरमधील आवरामध्ये ठेवण्यात आले होते. तेथुनचं त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आली. त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकाऱ्यांना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील तर ह्या बेजबाबदार व निष्क्रिय आमदारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी श्रीरामपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुनिल वाणी , अशोकचे संचालक बबन मुठे ,भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर , विशाल अंभोरे , विशाल यादव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्याकडे निवेदनाद्वारें केली आहे. निवेदनावर अनिल भनगडे , रामभाऊ तरस , प्रफ्फुल डावरे , सुनिल दिवटे , संतोष हरगुडे , मुकुंद हापसे , महेश खरात , मुकुंद लबडे, विजय लांडे , अक्षय वर्पे , रुपेश हरकल , विशाल गायधने , आण्णा भालेराव , रवी कनगरे बाळासाहेब आहिरे , अरुण शिंदे , सुहास पंडित , अमोल मावस ,बापू वडीतके ,सुदाम बढे , अक्षय कावरे , आदेश मोरे , रोहित मुसमाडे , पुरुषोत्तम भराटे , अविनाश काळे , मच्छिंद्र हिंगमीरे , पंकज करमासे , गणेश कांबळे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here