श्रीरामपुर/प्रतिनिधी : श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला श्रीरामपुर शहर तसेच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु आता तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांत श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणूनच आज प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत संपूर्ण श्रीरामपुर शहर रविवार १३सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरुवातीच्या काळात श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या प्रचंड वाढल्याने अखेर प्रशासनाला लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. राहुरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून बाधितांचा वेग वाढला आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन हतबल झाले होते.


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन करून, जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेरीस प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत श्रीरामपुर शहर १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here