कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- काल दि.१० सष्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेचे सुमारास चांदेकसारे परीसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने परीसरात अतिवृष्टि जन्य परीस्थिती निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि आज सायंकाळी पाच वाजेसुमारास अचानक घारी, चांदेकसारे, डाऊच, जेउरकुंभारी, झगडेफाटा,या पंचक्रोशीत मुसळधार पावसाने हजेरी लावली सुमारे दोन तास चालेल्या जोरदार पावसाने नागरीकांची पुरती धांदल उडाली होती.
चांदेकसारे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असुन घरातील संसार उपयोगी वस्तु भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रात्रीच्या जेवणासाठीच्या स्वयंपाकाची वेळ असल्याने गृहीणींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
माजी सरपंच केशवराव होन यांनी सदर घटनेची माहिती कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली माहीती मिळताच तहसिलदार तातडीने घटनास्थळी हजर झाले व गावातील सखल भागातील पाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने नदीपात्रात काढण्यात आले.
घारी व चांदेकसारे या दोन्ही गावा दरम्यान असणाऱ्या घारी नदीच्या पुलावर पाणी असल्याने तहसिलदारांना घारी गावात पहाणी करण्यासाठी जाता आले नाही.
माजी सरपंच केशवराव होन व तहसिलदार योगेश चंद्रे साहेब यांनी या बिकट परीस्थित तत्परता दाखवुन ग्रामस्थांना संकटातुन बाहेर काढले नागरीकांन मधुन त्यांचा या कामाचे कौतुक होत आहे.