श्रीरामपूर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यासाठी असलेल्या डेडिकेटेड सर्व्हिस सेंटर (जर्मन हॉस्पिटल) , डॉ आंबेडकर वस्तीगृहातील कोवीड केअर सेंटर येथील गलथान कारभारामुळे करोना रुग्णांची प्रचंड गैरसोय व हेळसांड होत असून या दोन्ही केंद्रांच्या सेवा सुविधा व कारभारामध्ये त्वरित सुधारणा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रांताधिकार्‍यांना सविस्तर निवेदन दिले असून या दोन्ही केंद्रांच्या कामात व तालुक्यातील आरोग्य सुविधेत त्वरित सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलना केले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शहराध्यक्ष किरण लुणे यांनी केले .या शिष्टमंडळात नगरसेवक दीपक चव्हाण, अभिजीत कुलकर्णी, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे ,संजय यादव,गणेश भिसे, शेखर आहेर ,सोमनाथ कदम राहुल आस्वले ,मुकेश साळवे, विशाल त्रिवेदी, आनंद बुधेकरआदी सहभागी झाले होते

यावेळी दिलेल्या निवेदनात जर्मन हॉस्पिटल येथील ॲडमिट होणाऱ्या रूग्णांवर अत्यंत तोकड्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे उपचारावर परिणाम होत असून तेथे रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तेथे तीन व्हेंटिलेटर असूनही जर्मन हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा नसल्याने प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध होत नाही त्यामुळे व्हेंटीलेटर वापरता येत नाही यासारख्या अनेक गैरसोयींमुळे करोना रुग्णांची श्रीरामपुरात प्रचंड हेळसांड होत असून या साऱ्या रुग्णांचे जीवित धोक्यात आलेले आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील केअर सेंटर मधील तपासणी केंद्राच्या सुरू व बंद होण्याच्या वेळा निश्चित नाहीत तेथे तपासणीसाठी आज आखेर आलेल्या रुग्णांना केंद्राच्या गलथान कारभारामुळे प्रचंड मानसिक त्रास शारीरिक त्रास व गैरसोय सहन करावी लागत असून या त्रास कोण जबाबदार आहे या ठिकाणची गैरव्यवस्था त्वरित थांबून तेथे त्वरित सुव्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
जर्मन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधेसाठी नगरला सिव्हिल हॉस्पिटलला हलवले जाते तेथे गेल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला बेड शिल्लक नसल्याने सिव्हिल हॉस्पिटल पेशंट स्वीकारायला नकार देते या दोन्ही सरकारी आरोग्य व्यवस्थे मध्ये सुसूत्रता नसल्याने मृत्यूशय्येवर असलेल्या पेशंटला नगरमध्ये दवाखान्यांच्या दारात जीव मुठीत धरून दारोदार फिरावे लागते. या साठी परिस्थितीत सुधारणा होऊन जर्मन हॉस्पिटल व सिव्हील हॉस्पिटल या ठिकाणी अथेंटीक कनेक्टिव्हिटी निर्माण होऊन करोना रुग्णांचे जीव वाचवले जावे यासाठी त्वरित उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी करून या निवेदनात केलेल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यासआम्ही लोकशाहीतील आंदोलनाच्या सर्व मार्गांचा वापर करू असा इशारा ही या निवेदनात देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here