श्रीरामपुर/प्रतिनिधी :- सध्या श्रीरामपुरात बंद बाबत सर्वांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. काहीजण म्हणतात बंद ठेवू नका काही जण बंद ठेवा म्हणतात. मी बंद ठेवणाय्रांच्या बाजूनेच आहे परंतु हा बंद कुण्या राजकारण्यांनी जनतेला दाखवण्यासाठी की मला तुमची काळजी आहे, आणि राजकारण्यांचे सर्व कर्तव्य या बंद मुळे पार पडले यासाठी नाही तर, कोरोणा ची साखळी तोडण्यासाठी आहे, कोरोना ची साखळी तोडायची असेल तर सात दिवसाचा बंद काही उपयोगी येणार नाही, कारण शुक्रवारी 92 पेशंट सापडले आणि हा रेशो पुढील चार दिवस असाच राहील आणि चार दिवसांमध्ये अशी कोणती मोठी साखळी तुटली जाणार आहे त्यासाठी बारा ते चौदा दिवसांचा बंद आवश्यक आहे. तरच साखळी तुटेल व भविष्यातील पेशंटला इलाजासाठी दवाखान्यांमध्ये जागा मिळेल व गावातील नागरिकांचे जीव वाचेल.

श्रीरामपूरातील नगरपालिका आरोग्य प्रशासनाने श्रीरामपूर शहरात 500 खाटांचे सर्व सोयी युक्त कोवाड सेंटरची सुरुवात करायला हवी. तसेच कोरोणाची मोफत तपासणी साठी देखील शहरात एक सेंटर उघडायला हवे. या कार्यासाठी शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्व छोटे व्यापारी, राजकीय पक्ष, संघटना देखील यात सहकार्य करतील यात शंका नाही. बंद करण्यामागील उद्देश कोरोणा संसर्ग पसरू नये हा आहे. बाजारपेठ बंद करण्याचा उद्देश गर्दी होऊ नये व त्या गर्दीमुळे संसर्ग पसरू नये हा आहे

बंद ही शिक्षा नाही… उपयोजना आहे… असे मत श्रीराम सेवा संघाचे संस्थापक कुणाल करंडे यांनी व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here