शिर्डी/प्रतिनिधी :- शिर्डी या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा कर्मचारी यांच्या मागण्या व श्री साईबांबांचे मंदिर खुले करण्यात यावे अशा दोन मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थानचे के.एच.बगाटे मुख्याधिकारी व उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेब साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे नेते राजेंद्र सोपान जगताप , प्रताप कोते, अनिल कचरू कोते, कोळगे, बापु गंगाधर कोते पा. तसेच मनसेचे सहकार सेना सरचिटणीस व संपर्क अध्यक्ष अनिल चितळे साहेब मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विजय मोगले, तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव हे पदाधिकारी चर्चेला उपस्थित होते. यावेळी नांदगावकर साहेब यांनी बगाटे साहेबांना सर्व कर्मचारी यांच्या मागण्या मांडल्या व मंदिर साईभक्ता साठी लवकरच खुले करा ही मागणी केली. बगाटे साहेबांनी कर्मचारी यांच्या सर्व मागण्या मार्गी लावु असे सकारात्मक उत्तर दिलं व साईबाबा मंदिर उघडण्यास आम्ही संपुर्ण तयारी केली आहे एका तासात ४०० लोक दर्शन घेतील अशी व्यवस्था केली आहे.परंतु सरकारचा आदेश येईल त्याच दिवशी मंदिर उघडण्यात येईल अशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आंदोलना साठी दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर श्रीरामपूर शहराध्यक्ष सचिन पाळंदे, नितीन भुतारे, सतिश मस्के, ज्ञानेश्वर गाढे, सतिश काकडे,अनिल गायकवाड, विकी कांबळे, ज्ञानेश्वर पवळे, कैलास भुजबळ, महेश गायकवाड, संपत हतांगळे,गोरख पवार, रूपेश देवकर, राहुल देशमुख, कुणाल सांबारे, विशाल गुलदगड, दामोधर उमाप, सुरेश सोनवणे, किशोर पाडेकर, यश कोते, सागर जगताप, राजू कदम,सतिश काकडे,अनिल गायकवाड, अनिल गाढे, सुधाकर वाघमारे, प्रशांत वाघचौरे, लक्ष्मण कोतकर व नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती मनसेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दताञय शिवाजी कोते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here