श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० या वर्षासाठी जि.प.प्राथ.शाळा ममदापूर मराठी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर येथील उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब यांची निवड करण्यात आली..

श्रीमती सोनवणे मॅडम या तंत्रस्नेही शिक्षक म्हणून तालुक्यात परिचित आहेत.अनेक प्रशिक्षणात त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे .शाळेत सतत विविध शालेय व सहशालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवणे, सामाजिक, राष्ट्रीय कामात त्यांचा उस्फुर्त सहभाग, शालेय परिसर स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण,ज्ञानरचनावादी अध्यापन ई-लर्निंग अध्यापन, सप्तरंगी परिपाठ, कोविड १९ संकटकाळात शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमांतर्गत ऑनलाइन अध्यापन, edu.guru या यूट्यूब चैनल द्वारे स्वनिर्मीत व्हिडिओ बनवणे व विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅप ग्रुप वर पाठवून शिक्षण चालू ठेवणे,तसेच शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाद्वारे ऑनलाइन शिक्षणाला ऑफलाइन शिक्षणाची जोड देत शिक्षणाची ही ज्ञानगंगा सुरूच ठेवली.

श्रीमती सोनवणे मॅडम या जि.प. अहमदनगर ,आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते मा.ना. श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जि.प.अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार मा. श्री.सुजय दादा विखे पाटील,संचालक मा. श्री.सतीशराव ससाणे, पं. स.सभापती सौ.नंदाताई तांबे,उपसभापती मा. श्री.ओमेश जपे माजी उपसभापती मा.श्री.बबलू म्हस्के पाटील ,ममदापूर गावचे सरपंच मा.श्री.विजय जवरे पाटील, उपसरपंच मा.श्री.हनुमंत गर्दे , पोलिस पाटील श्री कळमकर, स्वरूप फाऊंडेशन चे सतीश म्हसे,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दत्तात्रय नारळे व सदस्य,सहशिक्षक व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ग.शि.अ.श्री पोपटराव काळे साहेब, शि.वि अ.श्री.वाकचौरे साहेब, केंद्र प्रमुख श्री.गमे साहेब,श्रीम.साळे मॅडम,शाळेच्या मुख्या.श्रीम.जगधने मॅडम, चांडेवाडी शाळेचे मुख्या.भालेराव सर, जि.प शाळा दत्तनगरच्या मुख्या. श्रीम.तांबे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here