रांजणखोल/प्रतिनिधी (भाऊसाहेब जाधव) :- कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”या सर्व्हेषण मोहिमेचा शुभारंभ राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात सरपंच चांगदेव ढोकचौळे यांच्या हस्ते करण्यात आला १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून रांजणखोल परिसरातील सर्व नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम राहाता तालुक ग्रामीण आरोग्य केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी ङाॅ.प्रकाश म्हस्के करत आहे यासाठी ही मोहिम महत्वाची असून नागरिकांनी गाफील न राहता प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपले कुटुंब सुरक्षित केल्यास पर्यायाने आपला महाराष्ट्र सुरक्षित होणार आहे. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून भविष्यात येणाऱ्या इतर महामारींच्या संकटांसाठी जनतेला तयार करण्याचे काम ही मोहिम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा प्रहार आहे. या मोहिमेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे शासनाने कोरोनापासून बचावासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उभारण्याचे काम केले आहे. आता लोकसहभागातून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम सर्वांनी मिळून यशस्वी केल्यास इतर राज्यांसाठी ती अनुकरणीय ठरेल, असा विश्वास ङाॅ.म्हस्के त्यांनी व्यक्त केला रांजणखोल आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेषण करत आहे रांजणखोल ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे याप्रसंगी मुळा प्रवरेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे,सरपंच चांगदेव ढोकचौळे,ऊपसरपंच परविन शेख,पोलीस पाटील कृष्णा अभंग,ङाॅ.प्रकाश म्हस्के,ग्रामसेवक भाऊसाहेब बहिर आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here