श्रीरामपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीरामपूरत सर्व पक्षीय तसेच संघटनांच्या वतीने जनता कर्फ्यु पुकारण्यात आला. या जनता कर्फ्युच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. मात्र बाहेरून येणारे व शहरात विना मास्क लावता टोळके करून, शासनाचे नियम धाब्यावर बसविणा-या नागरिकांवर कारवाई करण्या संदर्भात, तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, श्रीरामपूर पालिकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील व्यापारी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील कोरोना संक्रमण रोखण्याची नैतिक जबाबदारी पालिका प्रशासनाची असून. यासंदर्भात पालिका प्रशासनाने दंडात्मक कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन पाळंदे यांनी केली असता त्याला उपस्थित असलेल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विषय लावून धरला व मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारला, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेरे यांना याबाबत आपण काय काय कारवाई केली व कधीपासून कारवाई चालू करणार आहात व रुग्णां कमी करण्यासाठी काय काय उपाय योजना केले असे विविध प्रश्न विचारत असताना मुख्य अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन बैठकीतून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्याधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी व तसेच शहरातील लोकांचे सुख-सुविधा व आरोग्याचे काळजीपूर्वक काम करणे ही त्यांची जबाबदारी असून देखील,त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, पुढाकार घेणे अपेक्षित असतांना, ते निघून गेल्याने त्यांना शहराच्या आरोग्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले, त्यामुळे यशवंतराव चव्हाण सभागृहात गदारोळ झाला. यावेळी उपस्थितांनी निष्काळजी मुख्याधिकारी ढेरे यांचा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला, काही नगरसेवक यांनी समजून सांगितल्यानंतर मुख्याधिकारी हे परत सभागृहात येऊन माफी मागितली , व त्यांनी पालिकेत कर्मचा-यांची कमतरता असल्याचे कारण पुढे करत. आपल्या अंगलड आलेल्या प्रकरणात सारवा सारवी करण्याचा प्रयत्न केला.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक, नगरसेवक किरण लुनिया, नगरसेवक रवि पाटील, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक प्रताप ढोकणे, डॉ सचिन प-हे, समाजवादी चे जोयफ जमादार, कामगार नेते नागेशभाई सावंत, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, मनसेचे सचिन पाळंदे, दीपक दुग्गड, आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, सेनेचे सचिन बडदे, सेनेचे राजेंद्र देवकर, व्यापारी आघाडी चे रामा अग्रवाल, भाजपचे विशाल अंभोरे, तसेच सर्व पक्षाचे नेते व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here