श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- अधिकारी देखील माणूसच असतो अन त्या अधिकाऱ्यांत माणूसकी दडलेली असते याचा प्रत्यय श्रीरामपुर तहसील कार्यालयात आलेल्या एका वृध्द महीलेला आहे                               

  त्याचे झाले असे, की वृध्द महीला पुरुषांना शासनाच्या विविध योजनेचे मानधन मिळत असते मात्र अनुदान सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वेळोवेळी हयातीचे व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात संजय निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली एक वयोवृध्द महीला तहसील कार्यालयात तळमजल्यावर बसलेली होती सकाळी नेहमी प्रमाणे तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले जिन्याच्या पायऱ्या चढत असाताना त्यांची नजर त्या वृध्द महीलेवर गेली ही  महीला येथे आली म्हणजे हिचे नक्कीच तहसील कार्यालयात रेशन कार्डचे काम असावे अशी शंका आली जिना उतरुन ते त्या आजीबाई जवळ आले अतिशय वयोवृध्द झालेल्या त्या महीलेस तहसीलदार पाटील यांनी विचारले की आजी काय काम आहे

त्यावर त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे परंतु काही कागदपत्रे जमा नाही केली तर तो बंद होईल असा निरोप आल्यामुळे गावातुन आले  तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पहात असलेल्या अधिकाऱ्यांस खाली बोलविले अन सर्व कागदपत्रांची पूर्तता बघुन घेण्यास सांगितले तो पर्यत पाटील हे तिथेच उभे राहीले त्या आजी बाईचे काम झाल्यावर तहसीलदार पाटील हे कार्यालयात जाण्यासाठी जिना चढु लागले तोच त्या आजी बाईंनी पुन्हा हाक मारली तहसीलदार पाटील यांना वाटले आणखी काही काम बाकी असेल म्हणून हाक मारली असेल ते पुन्हा त्या आजी बाई जवळ गेले व आस्थेने विचारले की तुमचे काम झाले का अजुन बाकी आहे आजी बाई म्हणाल्या काम तर झाले पण दोन चार रुपये दिले असते तर फार बरे झाले असते गावाकडे जायला तहसीलदार पाटील यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयाची नोट काढुन त्या आजी बाईला दिली अन क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले हे सर्व तिथे उभे असलेले नागरीक पहात होते एकाने त्या आजीबाई जवळ जावुन विचारले आजी तो माणूस कोण होता माहीती आहे का त्यावर आजी म्हणाली नाही कोण होता त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहे अन मग आजीबाईच्या डोळ्यात खळकन पाणी आले अन आजीबाई इतकच म्हणाल्या त्यांच्या रुपात माझा देवच आला होता मला मदत करायला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here