श्रीरामपुर/प्रतिनिधी :- जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच आ. लहू कानडे यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी निवड केली.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात मुरकुटे याची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पूर्वी अशोक मिल्क , रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे याचे ते पती आहेत. संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव असल्याने त्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आ. लहू कानडे, युवक नेते व उपनगराध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर , तालुका अध्यक्ष अरुण नाईक यानी सागितले. त्यांच्या निवडीबद्दल नगरसेवक, श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेस, जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य ,युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस,सेवा दल, विविथ संस्थंचे पदाधिकारी,हितचिंतक, मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here