महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप
श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील महाकाळ वडगाव येथील शेतकरी श्री किशोर रामनाथ पा पवार विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय, शेतात खत टाकण्यासाठी गेला असता विजेच्या तुटलेल्या ताराला किशोर स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतातील विजेची तार खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याच आरोप नातेवाईकांनी केला आहे.