शिर्डी/ प्रतिनिधी :- साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांसमवेत वैद्यकीय तपासणीसाठी गेली असता रुग्णालयातील डॉक्टरने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून डॉक्टर वैभव तांबे यास रात्री उशिरा अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.




दि. 19 सप्टेंबर रोजी पहाटे शिर्डी शहरातील अल्पवयीन मुलीस अचानक त्रास जाणवू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॅज्युलिटी विभागात तपासणीसाठी नेले.

तेथे ड्युटीवर असलेला डॉ. वैभव बबन तांबे याने तपासणीचा बहाणा करत तिचा शारीरिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरच्या विरोधात मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी तातडीने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली.


यादरम्यान पीडित मुलीची विचारपूस केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी डॉ. वैभव बबन तांबे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत 8 व 10 नुसार तसेच भा.दं.वि कलम 354 ( अ ),( ब ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here