श्रीरामपूर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर आरटीओ ऑफिस मध्ये अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे फोटो टाकलेले प्रकाश चित्ते यांना आढळले त्यावरून त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी खान यांना धारेवर धरले दोषींवर कारवाईची मागणी केली त्यावेळी श्री खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल ताबडतोब तोंडी माफी मागून लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाईचे लेखी पत्र दिले त्या नंतरच श्री चित्ते यांनी आरटीओ ऑफिस सोडले

एका कार्यकर्त्याच्या कामाकरता भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हे आरटीओ ऑफिस येथे गेले असता दुसऱ्या मजल्यावरील विश्रामगृहाच्या एका खोलीला आरटीओ ऑफिस नाही अडगळीची खोली बनवून सारा कचरा या खोलीत टाकलेला होता अशा खोलीत पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा फोटो टाकलेला आढळला या प्रकाराचेफोटो काढून ही घटना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या खान यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना धारेवर धरले व कडा जाब विचारला व दोषींवर कारवाईची मागणी केली

या अडगळीच्या खोलीत हे फोटो कधीपासून आहेत ? तेथे ते कोणी नेऊन टाकले ? तेथे टाकणाऱ्यांचा हेतु काय ? टाकणाऱ्या दोषींवर कारवाई करणार काय ? या प्रश्नांची मला ताबडतोब उत्तर द्या असा प्रश्नांचा भडिमार करून श्री खान यांना धारेवर धरले यावेळी श्री खान यांनी ताबडतोप तोंडी माफी तेव्हा श्री चित्ते यांनी मला लेखी द्या अशी मागणी केली यावर श्री खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाई चे लेखी पत्र दिले तेव्हा श्री चित्ते यांनी आरटीओ ऑफिस सोडले मागितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here