श्रीरामपुर/प्रतिनिधी :- केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदी मुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे या शेतकरी विरोधी निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तरी कांदा निर्यातबंदी त्वरीत उठून देशातील नागरिकांना पोषण आहार पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभर मंदीचे सावट आहे. देशात व राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात हंगामी घसरण होऊन बाजारात कांद्याची आवक कमी होऊन भाव वाढल्याने केंद्राने तात्कालिक परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) अधिसूचनेद्वारे कांदा निर्यात बंदी जाहीर केली आहे. राज्यातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जागतिक कोरोना महामारीमुळे गतवर्षीच्या ४४ कोटी डॉलर्सच्या कांदा निर्यातीसमोर यावर्षी फक्त १९.८ कोटी डॉलर्सची कांदा निर्यात झाली आहे. आधीच योग्य पंचनाम्या अभावी अवकाळी पावसाच्या अस्मानी-सुलतानी संकटास एकट्यानेच तोंड देणाऱ्या बळीराजास सरकारने पूर्णपणे उघड्यावर सोडल्याचे दिसत आहे. या मुळे बेभरवसाच्या वीज, पाणी, शेतमालाच्या भावांचे चढ-उतार, शेतमालाला बाजारपेठांची अनुपलब्धता, ७५ टक्के सडलेला साठवणूक केलेला कांदा आदि समस्यांनी राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच उभी राहिली असून शासनाने तात्कालिक निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक गोर गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुरच्या वतीने मा. तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले

या निवेदनाची दखल घेऊन शासनाने त्वरित कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल मग होणाऱ्या परिणामास प्रशासन व शासन जबाबदार राहिल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी बोलताना सांगितले यावेळी मनसे जिल्हासरचिटनिस तुषार बोबडे, जिल्हासचिव डॉ संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे उदय उदावंत, तालुकाध्यक्ष मनविसे राहुल दातीर,शहराध्यक्ष मनविसे विष्णु अमोलिक, तालुका संघटक गणेश दिवसे, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सचिव विकी राऊत, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुका सरचिटणीस गोरख येळे, सरचिटणीस रोहित जोजाळ, तालुका सरचिटणीस अमोल साबणे, शहर चिटणीस ज्ञानेश्वर काळे, उपतालुकाध्यक्ष नवनाथ बोर्ड, उपशहरध्यक्ष राजू शिंदे, उपतालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, उपशहरध्यक्ष रोहित बेंद्रे, तालुकाध्यक्ष अशोक पोटे, उपशहरध्यक्ष जावेद शेख, उपतालुकाध्यक्ष करण कापसे, उपशहरध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक मनविसे विकास शिंदे, उपशहरध्यक्ष मनविसे रतन वर्मा आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here