राहता :- पोलिसांच्या सतर्कते मुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसला तब्बल 1 लाख 68 हजार 470 रुपये चोरून नेण्याचा असफल प्रयत्न या दरोडेखोरांनी केलाय

पैसे भरण्यासाठी बँकेत जात असताना चितळी येथील साळुंके पेट्रोल पंपाच्या मॅनेजर च्या हातातून पैश्याची बॅग ओढून नेण्याचा भ्याड प्रकार समोर आलाय याच सर्व घटनेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शंकर चौधरी यांच्या सतर्कते मुळे अवघ्या दीड तासात आरोपी जेरबंद करण्यात तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे

या गुन्ह्यात दरोडा टाकणारे 3 आरोपी असून तिघांना दरोड्यातील रक्कमे सह तालुका पोलिसांनी अटक केले असून त्यांच्या वर गुन्हा रजिस्टर नं 471/2020 कलम 392,341,334 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here