श्रीरामपूर(प्रतिनिधी)- ऑक्टोबर महिन्यापासून श्रीरामपूर शहरातील हरिकमल प्लाझा येथे शासकीय आधार केंद्र सुरू होत असल्याची माहिती शासकीय आधार केंद्र सुपरवायझर इरफान शेख यांनी दिली.
शहरातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी, अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिस येथे थांबावे लागत आहे. शासकीय पातळीवर आधार केंद्राची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने येत्या पंधरा दिवसात हरीकमल प्लाझा येथील आधार कार्ड केंद्र पूर्ववत सुरू होणार आहे.
या व्यतिरिक्त भोकर, बेलापूर, गळनिंब, पोस्ट ऑफिस येथेही नवीन आधार कार्ड नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिवाय शहर व तालुक्यासह तब्बल १५ हून सीएससी केंद्रांना आधार कार्ड अपडेटची परवानगी मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

स्वराज्य समाचार इफेक्ट :- आपल्या पोर्टल वरून बातमी प्रसिद्ध होताच शासकीय आधार केंद्र सुपरवायझर इरफान शेख यांनी दिली ही माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here