श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर नगरपालिकाहद्दीतील प्रभाग क्रमांक १६ ची इतिहासात झाले नाही इतकी मोठी प्रमाणात दुर्दशा झाली आहे त्यामुळे या भागाला कोणी वाली राहिला आहे की नाही अशी अवस्था झाली आहे नगर पालिका प्रशासन श्रीरामपुरात काम करत आहे की नाही अशी शंका आता जनतेला वाटू लागली आहे या प्रभागात प्रचंड घाण ,कचरा साचला आहे ते उचलणारे कर्मचारी वेळेवर येत नाही आले तरी जनतेशी उर्मटपणे बोलतात .प्रभाग क्रमांक सोळा मध्ये असलेल्या थत्ते ग्राऊंडमध्ये इतके मोठे खड्डे पडले आहेत की कोणी त्यावरून चालूही शकत नाही मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे सेंटर म्हणून ते ग्राउंड ओळखले जाते की काय अशी अवस्था झाली आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य हे सर्व नादुरुस्त झाले आहे सदरील ठेका ज्या व्यक्तीला दिला तो कधीही ते वस्तू रिपेअर करत नाही.

शहरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना प्रभाग सोळा मध्ये खूप थोडावेळ पाणी येते आले तरी ते गढूळ आणि बेचव प्रमाणात येत असते नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष अनुराधाताई अधिका कानावर कितीही वेळा गोष्टी घातल्या तरी तिकडेच साफ दुर्लक्ष केले जाते
या प्रभागातील अनेक लोकांना कोरोना ची लागण झाली पण नगरपालिकेत यथायोग्य व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झालेत आणि काही लोकांना प्राणही गमवावा लागला त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने धोरणासंदर्भात सुद्धा लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन जनतेची सेवा होईल अशा गोष्टी कराव्या सर्व अपेक्षा जनतेकडून करू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here