श्रीरामपुर/प्रतिनिधी :- हरेगाव ते सरला बेट रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक वर्षांपासून या भागातील जनता या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही या रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही येथील ग्रामस्थ रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करतच आहेत

नेत्यांना लोकप्रतिनिधीनो या  या भागाच्या रस्त्याने  जर फिरकून पहा मग पहा कसा भयानक त्रास सहन करावा लागतो काही फक्त विरोध म्हणून या भागाकडे दुर्लक्ष केले जाते की काय असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे या रस्त्याच्या कामांना कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न निर्माण होत आहे नेत्यांनो या भागातील रस्त्याकडे उघडा डोळे अन पहा नीट
   
राज्यात महामार्गाच्या रस्त्यांचा चांगल्या प्रकारे विकास होताना दिसत आहे हे खरे आहे यात शंका नाही मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप मोठी दुर्दशा झालेली असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे गेल्या कित्येक वर्षेपासून रस्त्यांचा विकास खुंटला आहे या रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळत आहे सर्व रस्ते उधडलेल्या अवस्थेत  आहेत सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाकडून ठराविक रस्त्यांसाठीच निधी मंजूर केलेले आहेत खराब झालेल्या या रस्त्यांनी नागरिकांनी  कसा प्रवास करावा काही ठिकाणी वाहनांना जाता येईना तर काही ठिकाणी नागरिकांना सुद्धा चालता येईना अशी या भागातील रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाली आहे दिवसेंदिवस नागरिकांना या रस्त्याची झळा सोसावी लागत आहे  डिजिटल भारत निर्माण होणार काही ठराविक लोकप्रतिनिधींनी ठाराविक भागातील चेहरे पाहून थोडीशी धडपड करून मोजक्याच भागाचा रस्त्याची दुरुस्ती केली आहे परंतु या रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळणार व नागरिकांना दिलासा मिळेल रस्त्याच्या कामाच्या मुहूर्त कधी मिळणार प्रशासन कधी तत्परता दाखवणार असा सवाल निर्माण होत आहे

तरी येथील जनतेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुरच्या वतीने मा. उप अभियंता साहेब सा. बा. उप विभाग यांना निवेदन देण्यात आले

या निवेदनाची शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल मग होणाऱ्या परिणामास प्रशासन व शासन जबाबदार राहिल असे मनसे जिल्हासचिव डॉ संजय नवथर.यांनी बोलताना सांगितले यावेळी मनसे जिल्हासचिव डॉ संजय नवथर, जिल्हासरचिटनिस तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे उदय उदावंत, तालुकाध्यक्ष मनविसे राहुल दातीर,शहराध्यक्ष मनविसे विष्णु अमोलिक, तालुका संघटक गणेश दिवसे, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सचिव विकी राऊत, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुका सरचिटणीस गोरख येळे, सरचिटणीस रोहित जोजाळ, तालुका सरचिटणीस अमोल साबणे, शहर चिटणीस ज्ञानेश्वर काळे, उपतालुकाध्यक्ष नवनाथ बोर्ड, उपशहरध्यक्ष राजू शिंदे, उपतालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, उपशहरध्यक्ष रोहित बेंद्रे, तालुकाध्यक्ष अशोक पोटे, उपशहरध्यक्ष जावेद शेख, उपतालुकाध्यक्ष करण कापसे, उपशहरध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक मनविसे विकास शिंदे, उपशहरध्यक्ष मनविसे रतन वर्मा आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here