श्रीरामपूर :- भारतीय जनता पार्टी देशभरात पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या आठवड्यात विविध प्रकार च्या सेवाकार्यातून त्यांहा शुभेच्छा देत आहे. याच सेवा सप्ताहच्या अनुषंगाने उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर यांचा मार्गदर्शन खाली श्रीरामपुर शहर भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर चे 23 तारखेला दादा वामनराव जोशी शाळेत आयोजन करण्यात आले होते
रक्तदान हे श्रेष्ठदान मानून गरजूला जीवनदान द्यावे ही भावना ठेवून राष्ट्रभक्त सुजान नागरिकांनी मोठ्यप्रमानात या सेवाकार्यात सहभागी झाले तसेच वृक्षारोपण हे काळाची गरज आहे त्यामुळं रक्तदात्याला रोप देण्यात आले यावेळी ७८ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा चा वतीने हा कार्यक्रम घेन्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाउपाध्यक्ष विशाल यादव , संघटन सरचिटणीस अक्षय वर्पे, आनंद बुधेकर ओंकार झीरंगे यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन पार पाडले.

कार्यक्रमाचे उदघाटन भारत मातेचा प्रतिमेला हार घालून करण्यात आले हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी , मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष विशाल फोफळे, मा. अध्यक्ष वैभव लोढा यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी कार्यक्रमाचे तालुका प्रभारी जिल्हा नियोजन सदस्य सोनालिताई नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे हेही उपस्थित होते तसेच भाजपा चा भाजपा चा नगरसेविका वैशालिताई चव्हाण,नगरसेवक केतन खोरे, नगरसेवक रवी गुलाटी, नगरसेवक जितेंद्र छाज्जेड , शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बदडे ,निखिल पवार , सुभाष जंगले, संदीप शहा (नटराज),भारत शिंदे, कृष्णा किराड, सचिन पारख हे उपस्थित होते, गणेश मुदगुले यांनी रक्तदात्याना त्यांचाकडून रोपे देण्यात आली यावेळी त्यांचे आभार मानले.

तसेच कार्यक्रमाला भाजपा चे नेते गणेश राठी, तालुकाध्यक्ष सुनील वाणी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूस्कर, मा.शहराध्यक्ष मारुती बिंगले, अशोक कारखाना संचालक बबन मुठे , अनिल भनगडे, अरुण धर्माधिकारी, राजेंद्र कांबळे , डॉ. ललित सावज, प्रफुल्ल डावरे, अजित बाबेल, अमित मुथा, मनीष राठी, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, अक्षय नागरे, आनंद बुधेकर, ओंकार झिरंगे, रुपेश हरकल, विशाल अंभोरे, अमोल आंबिलवादे आदीं उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला दादा वामनराव जोशी शाळा, जनकल्याण रक्तपेढी, अहमदनगर यांचे विशेष सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here