श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे मालेगाव येथील सत्यमालिक लोकसेवा ग्रुप च्या सहकार्याने तीन दिवसीय कोरोना जागरूकता अभियान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले .श्रीरामपूर बेलापूर या दोन ठिकाणी झालेल्या याशिबिराचा 700 पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला .
सत्यमालिक चे अध्यक्ष एजाज अन्सारी यांचे नेतृत्वा खाली मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली . यामध्ये डॉ.शकील मेमन, डॉ. अरविंद पाल, डॉ. फैजान शब्बीर ,डॉ .मोहम्मद तल्हा,डॉ . शोएब व त्यांचे सहकारी सामिल होते .
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र जमेअतुल उलेमा संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना हाजी मोहमद मक्की, नबीए रहेमत फौंडेशन चे अध्यक्ष मौलाना इम्तियाज इक्बाल, हाजी जलीलभाई काझी, पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक, शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पणण, साजीद मिर्झा, अहमदभाई जहागीरदार, कलीम कुरेशी, महेबुब कुरेशी, ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. तौफिक शेख आदि उपस्थित होते .

प्रास्ताविक सहायता संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रिजवानुल हसन यांनी केले. संजय नगर जवळील ईदगाह मैदान शेजारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये ताप,सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांबाबत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुफ्ती रिजवानुल हसन, हाजी जलील काझी, सलीमखान पठाण,साजीद मिर्झा, सोहेल बारूद वाला,डॉ. तौफीक शेख, डॉ. नाजीम शेख, डॉ. मतीन शेख, आदिल मखदुमी, महेबूब कुरेशी, फिरोज पठाण, इस्माईल शेख तसेच संविधान बचाव समिती, लब्बैक ग्रुप, गरीबनवाज फौंडेशन, उर्दू साहित्य परिषद,मिल्लत ए इब्राहिम ग्रुप, सुलतान नगर ग्रुप आदि संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here