श्रीरामपूर – बँकेने पथ विक्रेत्यांची अडवणूक थांबावी या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या उत्तर जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली लॉकडाऊन काळात पथ विक्रे त्यांची मोठ्या प्रमाणात हेळकांड झाली असुन अर्थिक बोजा पडून त्यांना त्यांच्या व्यवसायात अर्थिक मदत
मिळालेली नाही मधल्या काळात मालाची उलाढाल खरेदी विक्री होऊ शकली नाही यामुळे त्यांच्या कुटूंबावर
आर्थिक उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणुन मा. पंतप्रधान यांची पथ विक्रेते हि योजना आणुन व्यवसायकांची होणारी अर्थिक पिळवणूक थांबवावी म्हणुन नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्यामार्फत छोटे व्यावसायीकांना राष्ट्रीय कृत बँकेमार्फत प्रत्येकी दहा हजार रूपये व्यवसाय वाढीसाठी
विनातारण, विनाजामिन दहा हजार रूपये जाहिर केले आहे मात्र नगर जिल्ह्यातील बँक अधिकारी हे पथ विक्रेता यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास जाणुन-बुजून टाळत आहे आम्ही तेवढ्यासाठी बँका उघडल्या नाही आमच्याकडे शासनाची कोणतीही योजना अथवा आदेश आलेली नाही आणि आलीच तरी ती पुन्हा परत पाठवुन देऊ शासन काहिहि योजना काढतात आणि आम्हाला पैसे वाटायला लावतात आणि बँकेला विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो नंतर आमच्या डोक्याला त्रास देतात अशी भाषा वापरून पथविक्रेता यांना अपमानीत करून कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता माघारी पाठविले जात आहे पंतप्रधान यांचेमार्फत पथविक्रेते यांच्या अर्थिक सहाय्य निधी योजने अंतर्गत सर्व नगर जिल्ह्यातील बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्यास आदेश व्हावे व त्यांना आत्मनिर्भर करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली बँकेने जर पथ विक्रेत्यांना पंतप्रधान योजनेअंतर्गत त्वरित कर्ज उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, कोषाध्यक्ष दिनेश जाधव, विकास डेंगळे, सचिव राहुल रणपिसे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन, जिल्हा सदस्य प्रकाश पवार, नामदेव जाधव, अशोक बोबडे, प्रताप राठोर, जिल्हा युवा सदस्य राहुल राऊत, प्रवीण जमदाडे,अक्षय कुमार, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख,आदींनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here