श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 600mm आहे .यावेळी आतापर्यंत पर्जन्यवृष्टी ने सारे उच्चांक मोडले असून आज पर्यंत पावसाची नोंद ११०० एमएम इतकी झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील साऱ्या शेतांमध्ये पाणीच पाणी असून या शेतांमधील पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन केली या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष( ओबीसी आघाडी) प्रकाश चित्ते यांनी केले यावेळी अभिजीत कुलकर्णी ,सुरेश आसने, देवीदास वाघ, गोकुळ खुरुद, मच्छिंद्र बांगर, विजय नानेकर,नितीन आसने, सतीश शेळके, भाऊराव सुडके, अरविंद नांगळ, काका शेला,रअजय नांन्नोर ,मच्छिंद्र कदम, नामदेव कदम, चेतन वडीतके ,संदीप वाघमारे, दत्ता नगरे ,नवनाथ लाटे, अशोक कारले ,बबनराव मोरे रा,मदास ढोबळे ,गणेश नागळ ,संजय शिंदे, किशोर पगारे, किशोर विटेकर, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतांमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या पावसामुळे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वीसारखे चर न राहिल्यामुळे या पाण्याचा लवकर निचरा होणार नाही. यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस ,ऊस ,बाजरी, व फळबागा या पिकांचे पर्जन्यवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी या शेतकऱ्यांचे केवळ पंचनामे करून भागणार नाही तर त्यांना सरसकट घसघशीत मोठी नुकसानभरपाई द्यावी . अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली.

यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पंचनामे ताबडतोब झालीच पाहिजे. भारत माता की ,जय वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here