राहुरी :- डॉक्टरने नर्सला शिवीगाळ करत तिचा विनयंभग केल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गणपत ऊर्फ बबलू भाऊसाहेब जाधव (रा. नांदगाव ता. राहुरी) असे डॉक्टर आरोपीचे नाव आहे. पिडीत नर्सने फिर्याद दिली आहे. फिर्यादी नर्स या नगर शहरातील खाजगी रूग्णालयात नोकरी करत आहे.


दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी या प्रेमदान चौकातून रस्त्याने पायी चालल्या होत्या. यावेळी बबलू जाधव हा त्याच्या दुचाकीवरून आला व फिर्यादीचा हात पकडून दुचाकीवर बस असे म्हणत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.

फिर्यादी यांनी दुचाकीवर बसण्यास नकार दिल्यानंतर जाधव याने शिवीगाळ करत तू जर माझ्यासोबत आली नाही तर कोंबडी सारखे कापून टाकेल असा दम फिर्यादी यांना दिला. पिडीत फिर्यादी या खाजगी रूग्णालयात नर्स म्हणून ड्यूटीवर जात असताना जाधव हा नेहमी त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी जाधव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी जाधव याला पिडीत नर्सच्या तक्रारीवरून दोन दिवसापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात बोलवून घेत समज दिली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here