श्रीरामपुर/प्रतिनिधी :- प्रधानमंत्री १५ सूत्री कार्यक्रम नुसार केंद्र सरकार कडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक फहीम शेख यांनी केला आहे.
 
मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. इ. पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना “पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती” दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त पहिली ते पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १००० रुपये तसेच इ. सहावी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. तसेच इ. अकरावी ते बारावी सहित ITI ,डिप्लोमा,पदवी व पदवीधर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६००० ये १२००० रुपये ची आर्थिक मदत “पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती”च्या स्वरूपात दिली जाते. याच बरोबर प्रोफेशनल व टेक्निकल अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५००० ते ३०००० हजार रुपये ची आर्थिक मदत “मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती” स्वरूपात दिली जाते. वरील सर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख “३१ ऑक्टोबर २०२०” आहे. अर्ज दाखल करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळा/ महाविद्यालया च्या मुख्याधिपक किंवा प्राचार्य यांच्याशी संपर्क साधा.  अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असा आहवान श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक फहीम शेख आणि सर्व सदस्य यांनी केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here