टाकळीभान ( वार्ताहर ) गेल्या आठ दहा दिवसात टाकळीभान व भोकर परिसरातील अतिवृष्टीने खरीपाची पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याच्या सूचना आ. लहु कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केल्या. त्यामुळे या परीसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत

परीसरात गेल्या आठ दहा दिवसापासुन सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे खरीपाची सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, भुईमुग, चारापिके पाण्याखाली गेल्याने काढणीस आलेल्या पिकात पाणी साचल्याने मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांकडुन केली जात होती. आमदार लहु कानडे यांनी महसुल व कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आ. लहु कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीभान पंचायत समिती गणाच्या सदस्या डाॕ. वंदना मुरकुटे यांनी महसुल व कृषी विभागाच्या पथकाला सोबत घेवुन टाकळीभान व भोकरची शिवारफेरी करुन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. यावेळी भोकर येथील पडझड झालेल्या घराचीही डाॕ. मुरकुटे यांनी पहाणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत पिकांची पाहणी करताना टाकळीभानचे कामगार तलाठी अरुण हिवाळे , ग्रामसेवक आर.एफ. जाधव, कृषी सहायक श्रीमती शिंदे , भोकरचे कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, सुदाम पटारे, बाबासाहेब तनपुरे, आबासाहेब रणनवरे, बंडोपंत बोडखे, सुनील बोडखे, नंदू तनपुरे, आबासाहेब तनपुरे, जोशी, सहायक संदीप जाधव , कोतवाल सदाशिव रणनवरे, रमेश पटारे, भाऊसाहेब भोईटे, वाल्मीक जाधव, बाबासाहेब तागड, दत्तु मते, राधाकिसन विधाटे, निलेश विधाटे, दत्ताञय खेडकर, सदाशिव पटारे, बाळासाहेब विधाटे, पंकज डिवरे आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here