श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरातील अनेक नवीन व जुन्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे सदर रस्ता बघत असताना हेच कळत नाही की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे अशी चर्चा शहराच्या नागरिकांमध्ये आहे तरी शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावी असे निवेदन श्रीरामपूर नगर परिषदेतील मुख्य अधिकारी यांना मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप शहराध्यक्ष सचिन पाळंदे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विष्णू अमोलिक या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की अनेक भागातील रस्ते पाच ते सहा महिन्यापूर्वी नव्याने बनवण्यात आले होते परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले म्हणून तर सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे आढळून येत आहेत तीन ते चार महिन्यापूर्वी गोंधवणी रोड वॉटर सप्लाय समोरील रस्ता बनविण्यात आला होता या रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत व अनेक ठिकाणी रस्ता कचलेला आहे म्हणजे रस्ता निकृष्ट दर्जाचा मटेरियल वापरल्याने नवीन रस्ता देखील खराब झाला आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर चौकशी कायदेशीर कारवाई करून कळ्या यादीत टाकून त्यांना यापुढे नगर परिषदेने रस्त्याचे व इतर कुठलीही कामे देऊ नयेत प्रामुख्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते समजले जाणारे वजा रस्त्यांमुळे श्रीरामपूरच्या बाजारपेठेत चालना मिळते असे रस्ते उदाहरणार्थ नेवासा- संगमनेर रोड मेन रोड शिवाजी रोड गोंधवणी रोड तसेच बेलापूर रोडला जोडणारा नोर्दन ब्रँच ते बेलापुर रोड बायपास या प्रमुख रस्त्यांना बघितल्यानंतर हेच कळायला मार्ग नाही रस्त्यामध्ये खड्डे पडले की खड्ड्यांमध्ये रस्ते बनवण्यात आले आहे
या रस्त्यांच्या अशा दुर्दैशामुळे श्रीरामपूरतील बाजारपेठेवर देखील परिणाम झालेला आहे कारण या रस्त्यांवरून चालताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो श्रीरामपुरातील नागरिक सध्या इतके धास्तावले आहेत की करोनाने मरो या ना मरो पण या खडयामुळे मात्र नक्कीच जीव जाईल अशी भीती सर्वसामान्य लोकांमध्ये आहे व या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पासून नागरिकांना डेंगू मलेरिया गोचीड ताप यासारखे गंभीर आजारही पसरत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आहे
या खडयामुळे किंवा या खड्यातील घाण पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास काही इजा झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आजारी असलेल्या नागरिकांना इलाजासाठी नगरपालिकेकडून खर्च वसूल करण्यासाठी आंदोलन असेल याची सुद्धा नोंद घ्यावी व आमच्या निवेदनाची दखल घेऊन शहरातील पाच ते सहा दिवसात खड्डे न बुजविल्यास नगरपालिके गेट समोर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल मंग होणाऱ्या परिणामास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन देत्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले

याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे उदय उदावंत, तालुकाध्यक्ष मनविसे राहुल दातीर, तालुका संघटक गणेश दिवसे, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सचिव विकी राऊत, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुका सरचिटणीस गोरख येळे, सरचिटणीस रोहित जोजाळ, तालुका सरचिटणीस अमोल साबणे, शहर चिटणीस ज्ञानेश्वर काळे, उपतालुकाध्यक्ष नवनाथ बोर्ड, उपशहरध्यक्ष राजू शिंदे, उपतालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, उपशहरध्यक्ष रोहित बेंद्रे, आदी महाराष्ट्रसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here