श्रीरामपुर/प्रतिनिधी :- वार्ड नंबर 1 व सिद्धार्थनगर येथे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे सिद्धार्थनगरमधील अंतर्गत रस्ते तसेच बाह्य रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे त्याचप्रमाणे भागातली गटारी मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या असल्याने या भागात डासाचे व इतर कीटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे भागातील वृद्ध व बालके आजारी पडत असून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे नगरपरिषदेचे सिद्धार्थनगर व प्रभाग ४ मध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे याबाबत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केलेली आहे परंतु त्‍यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कामाची टाळाटाळ केली जात आहे एवढ्यावरच प्रश्न संपत नसून प्रभात ४ तसेच सिद्धार्थनगर या परिसरात एम एस ई बी कायम विजबंद करीत असते त्यामुळे कामाचा खोळंबा होत असतो तसेच वीज बंद पूर्वसूचना एम एस ई बी कधीही देत नाही शहर परिसरात तसेच इतर भागापेक्षा प्रभाग ४ तसेच सिद्धार्थ नगर मध्ये महावितरण कुठलीही पूर्वसूचना न देता वीज बंद करीत असते प्रभाग ४ मोठा असल्याने अतिरिक्त लोडमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित असल्यामुळे काही दिवसांपूर्वी महावितरणने सिद्धार्थनगरमध्ये एक डी पी बसविण्यात आली आहे परंतु अनेक दिवस उलटूनही महावितरणने सदर डी पी कार्यान्वित न केल्याने वीज पुरवठा हा नेहमी पेक्षा आता जास्त वेळा खंडित होत आहे याचा त्रास प्रभाग क्रमांक ४ व सिद्धार्थ नगर मध्ये नागरिकांना सोसावा लागत आहे प्रभाग चार व सिद्धार्थनगर नगरपालिका व महावितरण नेहमीच अन्याय करीत आलेले आहे सदरचे दोन्ही प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास नगरपालिका व महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनसेवक रितेश एडके यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here