रांजणखोल (वार्ताहर) केंद्र सरकारने देशात लागु नव्या कामगार कायद्याविरोधात सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज व प्रभात  उद्योग समुह येथील कामगार कायद्याला विरोध करत कामगार संघटनेच्या वतीने खा.सदाशिव लोखंङे व तहसीलदार श्रीरामपुर  यांना निवेदन देण्यात आले             

केंद्र सरकारने देशामध्ये नविन कामगार कायदा अमलात आणण्यासाठी कुठल्याही कामगार संघटने सोबत बैठक न लावता व विचारात न घेता कामगार विरोधी धोरण सरकारने लादले आहे हा कायदा कामगारांसाठी अहितकारक धोकादायक आहे यापुढे हे बिल जरी पास झाल्यामुळे कामगार वर्गामध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे केंद्र सरकारचा हा निर्णय उद्योजकांच्या फायद्याचा व कामगारांच्या तोटयाचा आहे केंद्र सरकारने हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा या चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावुन घेतले जाणार आहे कामगार कायद्याची पायमल्ली होणार आहे तरी केंद्र सरकारने देशांमध्ये घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज व प्रभात कामगार युनियनच्या वतीने खा.सदाशिव लोखंङे व तहसीलदार श्रीरामपुर  यांच्याकङे निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर अध्यक्ष दादासाहेब पोटे,अजित गिरमे,सचिन गिरमे,भारत ङोखे,रमेश राऊत,काकसाहेब वाणी ईरफान शेख,रफीक सय्यद,विशाल अमोलिक,संतोष केदारी आदिंच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here