माळवडगाव (वार्ताहर)- अडबंगनाथांची भुमि ही ज्ञानाचा परिस आहे. अडबंगनाथांच्या तपशिळे करिता मंदिर उभारणारी ही भुमि आहे. नवनाथांची कृपा आणि सदगुरु नारायणगिरी महारजांचे अशिर्वाद आहे. असे प्रतिपादन अरुणनाथगिरीजी महाराज यांनी केले.
बोला अलखनिरंजन चित्रपटाचे निर्माते घनश्याम येडे यांनी नवनाथांच्या मालिकेच्या पार्श्‍वभुमिवर भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानला भेट दिली. या संस्थानचे प्रमुख अरुणगिरीजी महाराज यांनी त्यांचा सन्मान करत त्यांना अडबंगनाथांच्या पवित्र भुमिची माहिती दिली. यावेळी राहाता पंचायत समितीचे माजी सभापती निवास त्रिभुवन, अंकूश महाराज, महेंद्र जेजुरकर, यांचेसह भाविक उपस्थित होते.

सदगुरुंच्या कृपेने मी घडलो, जगात गुरु शिवाय मला काहिच दिसत नाही, माझे जीवन त्यांच्या चरणावर समर्पित मी गुरुभक्त आहे. मला गुरु शिवाय काहिच श्रेष्ठ दिसत नाही. अरुण चा अरुणगिरी झालो, असे सांगत सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख करत गुरुंचे महत्व स्पष्ट केले. आपण येथे येण्यापुर्वी येथे जंगल होते, श्रीराम प्रभुंच्या पदस्पर्शाने ही भुमि पवित्र झाली. अडबंगनाथांचीही भुमि भाविकांना पवित्र उर्जा देते. येथे तपशिळा सापडणे व तीचे दर्शन होणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.

भक्ती करणारांना येथे संकट दूर करण्याच्या सामर्थ्य अडबंनाथात आहे. अदि मंदिर होते नंतर त्यात मुर्ती प्राणप्रतिष्ठा होते, परतु येथे तपशिळा होती, तीच्या साठी मंदिर उभारले. तपशिळा ही स्वयंभु आहे. त्रेता युगापासुन असलेली ही शिला श्रीरामाच्या अश्रु पासुन तयार झाली. नाथांच्या कृपेने पापे नष्ट होतात. नवनाथांच्या मालिकेला सहकार्य करु नवनाथांच्या मालिकेला आपण सर्वते सहकार्य करु, नवनाथांच्या पासुनच सर्व परंपरा सुरु होतात. त्यांचे कार्य मालिका रुपाने भाविकांसमोर येणे गरजेचे आहे. आवश्यक ती माहिती व यंत्रणा उपलब्ध करुन देवु असेही अरुणनाथगिरीजी महाराजांनी निर्माते घनश्याम येडे यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here