उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा मध्ये तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर चे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले
यावेळी मगर म्हणले की उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदा पा येथे राहणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या तरुणीवर शेतात काम करत असताना तिच्यावर चार नराधमाने अत्याचार करून तिची जीभ कापली पाठीचा कण्याचे हाड मोडण्यात आले व जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला अमानुषपणे अत्याचार करण्यात आले व पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्या तरुणीची प्राणज्योत मावळली व तेथील पोलिसांनी पीडितेचा मृतदेह वर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले यावरून तेथील सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे त्यामुळे सर्व समाजामध्ये असंतोष पसरला आहे व निषेध होत आहे त्यामुळे समाजाचा उद्रेक व्हावा नाही म्हणून आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्या व तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या अशी मागणी करण्यात आली व या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे भीमशक्तीचे सुनील संसारे अमोल काळे सचिन खांडरे संतोष मगर इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here