श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी अनेक वर्षापासून विविध संघटनेच्या मार्फत केली जात असून यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषण करण्यात आली आहे त्यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती परंतु श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेक अडचणी येत असून दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी केले आहे तसेच मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी ही सुद्धा मागणी केली आहे त्यामध्ये अहमदनगर जिल्हा विभाजन यातील महत्त्वाच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपली वेळ पाहिजे असे निवेदनात नमूद केले आहे

पुढे निवेदनात असे पण नमूद केले आहे की अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्य मध्ये सर्वात मोठा जिल्हा असुन प्रशासकीय सोय पोलीस प्रशासनवर वाढता ताण व अन्याय अत्याचार मध्ये गेल्या दोन तीन वर्षात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गोष्टी वर एकच उपाय आहे लवकरात लवकर अहमदनगर जिल्हा विभाजन व्हावा आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपली ५ ते १० मिनिटांची वेळ अपेक्षित आहे आपणास योग्य वाटल्यास आपण आपल्या योग्य वेळेनुसार वेळ द्यावी तसेच अतिशय महत्त्वाचे जिल्हा विभाजन हा ३० वर्षे जुन्या विषयावर योग्य चर्चा झाल्यास हा जिल्ह्यातील ऐतिहासिक असा २०२० सालातील योग्य निर्णय असेल तरी आपण मी पाठवलेल्या निवेदनाचा काळजी पुर्वक विचार करून भेटण्यासाठी वेळ द्यावा हिच नम्र विनंती आहे असे निवेदनात म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here