श्रीरामपुर/प्रतिनिधी :- मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी, श्री विजय कुराडे साहेब, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शिवाजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री प्र. ह. गायकवाड साहेब. पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री गजानन महादेव भगत साहेब श्री एस एम गावडे साहेब अध्यक्ष अहमदनगर जिल्हा श्री अण्णासाहेब भापकर हेड पी आर ओ अहमदनगर जिल्हा यांनी” कोरोना योद्धा” म्हणून घोषित केलेले तसेच श्री केसर शेख साहेब अहमदनगर सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले त्यामध्ये शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, तालुका पोलीस स्टेशन चे खान साहेब कामगार नेते व एस न्युज मराठी वहिनी चे संपादक नागेश भाई सावंत नगरसेवक रवी पाटील पत्रकार स्वप्निल सोनार यांना , मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे श्रीरामपूर शहर तालुका जनसंपर्क अधिकारी श्री तय्यब हसन पठाण,श्रीरामपूर शहर तालुकाध्यक्ष श्री हर्षकांत चंपालाल बलदोटा. श्रीरामपूर शहर सचिव श्री समीर रशीद सय्यद. श्रीरामपूर शहर संघटक श्री सागर सुभाष कुलकर्णी वरील श्रीरामपूर शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सदर मान्यवरांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . सर्व मान्यवरांनी कोरोना महामारी च्या काळामध्ये जनतेसमोर कोरोना ची सत्य व वस्तुनिष्ठ परिस्थिती समोर मांडली, तसेच शासन प्रशासनाच्या विविध योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले .यावेळी राहुल कापसे श्री संजय अशोक कोळसे , श्री आकाश यादव आदी उपस्थित होते.
Home श्रीरामपूर मानव अधिकार संरक्षण समिती,(नवी दिल्ली) रजिस्टर, भारत सरकार यांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा...