श्रीरामपुर/प्रतिनिधी :- उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यामध्ये तरुणीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या उत्तरप्रदेशातील पोलिस व सरकारचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला युपी येथील हाथरस जिल्ह्यातील चंदा पा येथे राहणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या तरूणीवर काही सैतानी प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार करून तिची जिभ कापली व पाठीच्या कणाचे हाड मोडले व त्याच्यावर विविध प्रकारच्या शारीरिक वेदना देवून तिची अमानुष्यपणे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली असतांना स्थानिक पोलीस प्रशासनाने पिडीत कुटूंबाची फिर्याद वेळीत घेऊन आरोपींवर कारवाई केली नाही. त्यामुळे या सैतानी प्रवृत्तीचे लोक खुलेआम फिरत आहे. जर वेळेत पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असती तर आरोपी आज जेरबंद झाले असते. ज्या पोलिसांनी फिर्द्याद घेण्यास टाळाटाळ केली व व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न कळवता मुलीची अंत्यविधी परस्पर पोलिसांनी केल्याने स्थानिक पोलिस आरोपींना पाठीशी घालून त्यांना सहकार्य करतात असे जाणवते अशा निष्क्रिय व बेजबाबदार पोलिसांना त्वरीत निलंबित करुन या घटनेत सहआरोपी करून या सर्वांना कठोर शासन करुन भरचौकात लोकांसमोर फाशीची शिक्षा करण्यात यावी व पिडीत कुंटूबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी पिडीत कुटूंबियांना लवकर न्याय न मिळल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देत्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले

याप्रसंगी तुषार बोबडे जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप उपजिल्हाध्यक्ष, सचिन पाळंदे शहराध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मनविसे उदय उदावंत, तालुकाध्यक्ष मनविसे राहुल दातीर, विष्णू अमोलिक मनविसे शहराध्यक्ष तालुका संघटक गणेश दिवसे, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सचिव विकी राऊत, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुका सरचिटणीस गोरख येळे, सरचिटणीस रोहित जोजाळ, तालुका सरचिटणीस अमोल साबणे, शहर चिटणीस ज्ञानेश्वर काळे, उप तालुकाध्यक्ष नवनाथ बोर्ड, उपशहरध्यक्ष राजू शिंदे, उपतालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, उपशहरध्यक्ष विशाल शिरसाट नंदू खेमनर उपतालुका अध्यक्ष, आदी महाराष्ट्रसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here