श्रीरामपुर/प्रतिनिधी :- भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार पत्रकारीतेच्या माध्यमातून चांगल्या वाईट घटनांचे वृत्त संकलीत करुन ते समाजापुढे मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. असे सर्व असतांना राज्यात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात पत्रकारांदरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन सरकारने राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा सर्वानुमते पारीत करन पत्रकारांना संरक्षणाचे कवच प्रदान केले तरीदेखील अवैध व्यवसाय तसेच राजकीय वरदहस्त असलेल्या गावगुंडांकडून विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जाणूनबुजून खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे यासह जिवे मारण्याचे प्रयत्न देखील होत आहेत. यातूनच अनेक निर्भिड पत्रकारांचा या राज्यात बळी गेला आहे. तरीदेखील मात्र पारीत केलेल्या कायदयाची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे होताना दिसत नाही त्यानूळे गुंड प्रवृत्तीचे लोकांना कायदयाचा धाक राहिलेला नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्या असलेल्या प्रतरा नदी पात्रातील चिंचोली येथे शासनाचा महसूल दूडवून होत असलेल्या अवैध रेती उत्खननासंदर्भात दैनिक राष्ट्रसहयाद्री या वृत्तपत्राच्या माध्यमातून दि. ३०/०९/२०२० रोजी चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्षा दत्तात्रय पोपट रोमनर यांनी केली. त्यानंतर दिनांक २/१०/२०२० रोजी बाभळेश्वर येथील काम आटोपून सायंकाळी ७-३० वा.चे सुमारास चांदेवाडी येथे घरी जात अरावांना रस्त्यात अडवून तु आमच्या विरोधात दातम्या देतो, तुझा काटा काढून टाकील, तुला दंपरखाली घेईल, जास्त माजला का, लोणाच्या जिवावर उड्या मारतो म्हणून दैनिकात छापून आलेल्या बातमीचा राग मनात धरन दिपक लाटे रा.चिंचोली ता राहुरी जि.अ.नगर,कोमल गिरने, गणेश हळनोर व त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अज्ञात इसमांनी दत्तात्रय पोपटराव खेमनर यांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पन्नचर खेमनर यांना उपचाराकरीता प्रतरा रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले असून या घडलेल्या प्रतरानंतर देखील आरोपी मात्र मोकाट फिरत असून पत्रकार खेमनर यांच्या जिवीतारा मोठा धोका उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामूळे यापूढे जिल्हयात पत्रकारांतर हल्ले होवू नये याकरीता पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींविरुध्द पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ अन्तये तात्काळ कठोर कारवाई करावी कारण यातील आरोपी पी दिपक लाटे व २) गणेश हळनोर यांच्याविराद मोक्काअंतर्गत कारवाई झाली असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीती काही घडप्याअगोदर प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा राज्यभरात तिव्र आदोलनाचा इशारा या निवेदनाव्दारे केला असुन याप्रसंगी लोकमंथनचे जेष्ठ पत्रकार-रंजन साळवी,राज्य संपर्क प्रमुख-विठ्ठल गोराने,इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेश अध्यक्ष-जयेश सावंत, न्युजसुपर वन चे अभिषेक सोनवणे, साईकिरण टाईम्सचे राजेश बोरुडे, भारत थोरात,एस न्यूज मराठीचे सचिन केदार,९९ फेमचे प्रताप राठोड,स्वराज्य समाचारचे स्वप्नील सोनार, आदित्य कुमावत आदी पत्रकार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here