श्रीरामपुर/प्रतिनिधी :- हरेगांव फाटा ते नाऊर या रस्त्यावरील खड्डे बुजविणो व दुरुस्तीचे काम नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यात यावे यासाठी वेळोवेळी मनसेच्या वतीने निवेदन देवून विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात आलेला होता. याची दखल घेऊन शासनाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. परंतु सदर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांने खड्डे बुजवितांना खड््यातील माती काढून खडी व डांबर टाकून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.परंतु सदर ठेकेदार खड्ड्यांमध्ये फक्‍त मुरुम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून काम करत आहे. या खड्ड्यामध्ये मुरुम टाकल्याने पाऊस पडल्यानंतर सदर मुरूम खड्यांमधून पाऊसाच्या पाण्यात वाहून जाणार आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक मोटारसायकल घसरुन अपघात होण्याची शक्‍यता आहे. व तसेच या मुरूमाची माती झाल्यानंतर वाहन चालकांच्या डोळ्यात, तोंडात धुळ गेल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही या गोष्टीची जाण असतांना संबंधित ठेकेदार फक्त प्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे व इस्टीमेट प्रमाणे काम न करता संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी देवून संगनमत करुन जनतेच्या व शासनाच्या डोळ्य्यात धुळफेक करुन राजरोसपणे काम करीत आहेत. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला हरेगांव, उंदीरगांव परिसरातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन विरोध केला असतांना खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांनी उध्दट भाषेत बोलून म्हणाले की, माझ्या ठेकेदाराची बांधकाम विभागातील अधिकार्‍यांबरोबर खालून-वर पर्यंत घनिष्ट संबंध आहेत. म्हणून तुम्ही किती विरोध केला व तक्रारी केल्या तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण संगळ्यांना हिस्सा पोहच होत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.अशा भाषेत ठेकेदाराचे कामगार बोलत होते.संबंधित कामाला वापरत असलेला पैसा हा जनतेचा आहे. याचा विसर ठेकेदार व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पडलेला आहे. किंवा त्यांना याची जाणीव नसेल परंतु महाराष्ट्र जवनिर्माण सेना जनेतचा पैसा वाया जाऊ देणार नाही नागरिकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव काम करीत असते सदर चालु असलेले काम इस्टीमेट प्रमाणे न झाल्यास मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठेकेदार व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाई पर्यंत होत नाही. तो पर्यंत तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.असे निवेदन देत्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले

याप्रसंगी तुषार बोबडे जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप उपजिल्हाध्यक्ष, डॉक्टर संजय नवथर जिल्हा सचिव.सचिन पाळंदे शहराध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मनविसे उदय उदावंत, तालुकाध्यक्ष मनविसे राहुल दातीर, विष्णू अमोलिक मनविसे शहराध्यक्ष तालुका संघटक गणेश दिवसे, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सचिव विकी राऊत, शहर सचिव स्वप्निल सोनार, तालुका सरचिटणीस गोरख येळे, सरचिटणीस रोहित जोजाळ, तालुका सरचिटणीस अमोल साबणे, शहर चिटणीस ज्ञानेश्वर काळे, उप तालुकाध्यक्ष नवनाथ बोर्ड, उपशहरध्यक्ष राजू शिंदे, उपतालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, उपशहरध्यक्ष विशाल शिरसाट नंदू खेमनर उपतालुका अध्यक्ष, आदी महाराष्ट्रसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here