श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर शहर हद्दीत नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या तलावात गेल्या काही महिन्यांमध्ये मृतदेह सापडणे, गाळमिश्रीत पाणी पुरवठा विशिष्ट चव व वास असलेला पाणी पुरवठा अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या श्रीरामपूर शहरातील नागरिक तोंड देत आहे. या सगळ्याची कमी असतांना गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद प्रशासनामार्फत रात्री ११ वाजता व्हॉटस्‌अपट्रारे संदेश येतो की, उद्या पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी काटकसरी पाण्याचा वापर करावा. रात्री ११ नंतर पाणी न येण्याचा संदेश आल्यानंतर लोक काटकसरीने पाणी कसे वापरणार कारण आदल्या दिवशी सगळे पाणी संपलेले असते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीरामपूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा संपूर्णपणे विस्कळीत झाला असून याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे.

श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आ. स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपरिषदेने श्रीरामपुर शहरातील पुढील काही वर्षांची लोकसंख्या विचारात घेता ८० कोटी
रुपये निधी खर्च करुन साठवण तलाव उभा केला. जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करणारी नगरपालिका म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचा नावलौकीक होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या नावलौकीकाला काळीमा फासला गेला आहे. याचा प्रत्यय श्रीरामपुरातील जनतेला आला आहे. तरी येत्या पाच दिवसांमध्ये जर श्रीरामपूर शहरातील पाणी पुरवठा सुरळी केला नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार याची याची नोंद घ्यावी असे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना देण्यात आले याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाने माजी उपनगराध्यक्ष अनिल कांबळे नगरसेवक संजय फंड नगरसेवक दिलीप नागरे माजी नगरसेवक तथा काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे सुभाष तोरणे दिपक कदम सुहास परदेशी रितेश एडके आदि कॉग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here