श्रीरामपुर(प्रतिनिधी) :- श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर परिसरातील एकलहरे आठवाडी शिवारात पोलीसांनी एका गोदामावर पहाटेच छापा टाकुन पंचेचाळीस लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन पोलीसांच्या या कारवाईमुळे गुटखा चालकांचे धाबे दणाणले आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक डॉ दिपाली काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एकलहरे आठवाडी शिवारात असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा उतरविला जाणार आहे त्या प्रमाणे पोलिस उपअधिक्षक दिपाली काळे यांनी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना कारवाईच्या सुचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी पी.एस.आय च्या पथका समवेत गोदामात छापा टाकला त्यावेळी गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला पोलीसांनी सर्व माल जप्त केला असुन कारवाई केली असुन परंतु या छाप्यानंतर परिसरात वेगवेगळी चर्चा चालु असुन दोन गुटखा व्यापऱ्यामधील व्यवसायीक स्पर्धेतुन ही टिप देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे गुटखा  पकडण्यात आला होता परंतु काहीच कारवाई झाली नाही आपला माल आपलाच धंदेवाला पकडून देत असल्याच्या कारणातुन ही पक्की खबर देण्यात आल्याची चर्चा चालु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस नाईक रामेश्वर दत्तात्रय ढोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सलमान ऊर्फ इरफान शब्बीर तांबोळी वय 30 वर्षे रा.नवले गल्ली,बेलापुर ता.श्रीरामपुर याच्याविरुद्ध गु.रजि.नं । २०१०/२०२० भा.द.वि.क १८८, २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा रजिस्टर करून गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडुन कलीम सय्यद यांचे शेतातील पत्र्याचे गोडावुन मधुन ३२,६४,०००/- रु.कि.च्या एकुण २७२ पांढरे रंगाच्या गोण्या,प्रत्येक गोणीमध्ये १०६ पुडके, त्यात हिरा नावाचा पानमसाला असलेले प्रत्येक गोणीची किंमत १२,०००/- रू तसेच ४,४८,०००/- रू कि.च्या एकुण २८ रंगीबेरंगी गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये हिरा नावाचा पानमसाला भरलेला प्रत्येक गोणीची किंमत १६,०००/- रुपये ९,४२,०००/-रु कि.च्या एकुण १५७ हिरवे रंगाच्या गोण्या,प्रत्येक गोणीमध्ये १०६ पुडके,त्यात रॉयल ७१७ नावाची सुगंधी तंबाखु असलेले ,प्रत्येक गोणीची किंमत ६०००/-रू २,५०,०००/-रु.कि.चा एक अशोक लेलंड कंपनीचा छोटा टेम्पो क्र.एम.एच १८ बी.वाय. ३०८३ असा असलेला अवैधरित्या गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखु वाहतुकीसाठी असलेला टेम्पो व ४,५०,०००/-रु.कि.चा एक आयशर कंपनीचा टेम्पो क्र.जी.ए.०७ एफ ३१०० असा असलेला अवैधरित्या गुटखा/ पानमसाला व सुगंधी तंबाखु वाहतुकीसाठी असलेला टेम्पो असा एकुण ५३,५४,०००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आला आहे हा मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला असा ३७,१२,०००/- रुपयांचा हिरा नावाचा पानमसाला व त्यामध्ये मिसळविण्यासाठी वापरण्याची रॉयल ७१७ नावाची ९,४२,०००/- रुपयांची सुगंधी तंबाखु व त्याची अवैधरित्या वाहतुक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहने पोलीसानी ताब्यात घेतली असुन सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिक्षक राहुल मदने श्रीरामपुर विभाग, यांच्या सुचनेनुसार व श्रीरामपुर शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/दत्तात्रय उजे, पोहेकॉ/जे.के.लोंढे, पो ना ढोकणे, अर्जुन पोकळे, पो कॉ सुनील दिघे,पंकज गोसावी,महेंद्र पवार,गणेश गावडे,किशोर जाधव निखिल तमनर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here